Spy Youtuber : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा आणखी एक युट्यूबर अटकेत

अमृतसर : पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा नंतर आता आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे.पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (एसएसओ)ने बुधवारी (दि. ४) एका पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश करत जसबीर सिंग या युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंगला पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने रूपनगर येथील माहलन गावातील रहिवासी जसबीर सिंग याच्याशी संबंधित असलेल्या एक हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला. 'जान महल' नावाचे युट्यूब चॅनल चालवणारा जसबीर सिंग याचा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर उर्फ ​​जुट रंधावा याच्याशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्याचा हरियाणा येथील सध्या अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​आणि एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश याच्याशीही जवळचा संपर्क होता.



पंजाब पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, जसबीर सिंग दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाला होता, जिथे तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला. जसबीरन २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी फोन नंबर सापडले आहेत, ज्यांची आता फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.


ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने या PIOशी केलेल्या त्याच्या सर्व संवादातील कंटेन्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो समोर येऊ नये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहालीच्या एसएसओसीने या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जसबीर सिंग हा भारतीय नागरिक आहे. तो 'जान महल' नावाचे युट्यूब चॅनल चालवतो. जसबीरचे युट्यूबवर ११ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.पाकिस्तानी हस्तकांसाठी काम करणाऱ्या अनेक मूळ भारतीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असल्याचा जसबीर सिंग याच्यावर आरोप आहे. “हेरगिरी-दहशतवादाचे व्यापक नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी आणि सर्व सहयोगींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे”, असंही त्यात म्हटले आहे

Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि