मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा?

लवकरच कॅस्ट्रोल कंपनीचे अधिग्रहण करणार ?


प्रतिनिधी: मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीबाबत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची बोलणी ब्रिटिश मल्टिनॅशनल ऑईल व गॅस कंपनी (British Multinational Oil and Gas Company) शी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्रिटिश मल्टिनॅशनल ऑईल कंपनीच्या लुब्रिकंट (Lubricant) व्यवसायाचे अधिग्रहण (Acquisition) मुकेश अंबानी करु शकतात असे संकेत मिळत आहेत.


यासंबंधीची सविस्तर माहिती अजून मिळू शकली नाही मात्र ब्रिटिश कंपनीला आपले अतिरिक्त (Overhead) खर्च कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच कंपनीने कॅस्ट्रोल विभागाची पुनर्रचना करणार असल्याचे सुतोवाच केले होते. या अंतर्गत कंपनी २०२७ पर्यंत २० अब्ज डॉलरची उभारणी करणार होती. बीपी (ब्रिटिश मल्टिनॅशनल ऑईल कंपनी) कंपनीने आपला प्रस्ताव आर्थिक कंपन्या ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंट व स्टोन्सपिक पार्टनर या कंपन्यासमोर ठेवला होता.


ब्लूमबर्गचा अहवालानुसार या व्यवहाराची किंमत ८ ते १० अब्ज डॉलर्स इतकी असू शकते. मुकेश अंबानी यांची रिलायन्स या व्यवहारासाठी उत्सुक आहे. रिलायन्सने हे अधिग्रहण केल्यास कंपनीच्या उत्पादन विस्तारास मदत होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार या अधिग्रहणासाठी अल्टरनेटिव्ह असेट मॅनेजमेंट, ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन व स्टोन्सपिक पार्टनर देखील उत्सुक आहेत. मागच्याच वर्षी कॅस्ट्रोल कंपनीला १२५ वर्ष पूर्ण झाली होती. सध्या कॅस्ट्रोल कंपनीकडून लिक्वीड कुलिंग टेक्नॉलॉजी (LCT) विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॅस्ट्रॉल हे कार आणि औद्योगिक वापरासाठी वंगण (Lubricant) तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यूकेमध्येही मालमत्ता विकत घेतल्या आहेत, ज्यात स्टोक पार्क लक्झरी हॉटेल आणि खेळण्यांचे किरकोळ विक्रेता हॅम्लीज यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही पेट्रोलियम रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि रिटेलसह विविध हितसंबंधांसह एक जागतिक समूह ठरला आहे.

Comments
Add Comment

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या