५ लाख नागरिक ‘ई-केवायसीविना’!

३० जूनपर्यंत मिळाली पुन्हा मुदतवाढ


पालघर:वारंवार मुदतवाढ देऊनही शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ५१ हजार ४१८ नागरिकांनी 'ई- केवायसी' केलेली नाही. रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आणखी एकदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. पालघर जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ४९ शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून धान्याचे वाटप केल्या जाते. जिल्ह्यात प्राधान्य योजनेचे ३ लाख ३४ हजार ९० शिधापत्रिकाधारक असून अंत्योदय योजनेचे ९७ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. दरम्यान, अन्नधान्य वितरित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्वच नागरिकांना राशन दुकानातील पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी २८ फेब्रुवारी ची 'डेडलाईन' देण्यात आली होती. या कालावधीत हजारो नागरिकांनी ई-केवायसी केली नसल्याने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊन या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एक लाखाहून अधिक शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या साडेपाच लाख शिधापत्रिकाधारकांनी ३० एप्रिल च्या मुदतीपर्यंत ई-केवायसी केलेली नाही.


एप्रिल महिन्यानंतर ई केवायसी करण्याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मे अखेरपर्यंत साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शासनाने ३० जून पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ दिली असून त्यानंतरही ई - केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद केल्या जाणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

'World Smile Day'- "जागतिक स्मित हास्य दिवस"...

"जागतिक स्मित हास्य दिवस" का साजरा केला जातो ? हे सविस्तर जाणून घ्या धकाधकीमुळे अनेकजण प्रचंड त्रासले असतात.