मुंबईमध्ये हजारो मुले शाळाबाह्य

मुंबई : शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार सरत्या शैक्षणिक वर्षांत (२०२४-२५) मुंबई शहरातून तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. त्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.


बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही दरवर्षी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात.


मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये