जेष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत भालेराव यांचा राजधानी दिल्लीतही प्रभाव

शेवगाव : देशाच्या अर्थकारणात अग्रगण्य असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेचे संस्थापक जेष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत चंद्रकांत भालेराव यांची "दि असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया"च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यापासून डॉ.भालेराव यांचे कार्यक्षेत्राच्या दिशा कमालीच्या रुंदावल्या आहेत.देशाच्या राजधानी दिल्लीतही त्याचा प्रभाव वाढला आहे.


डॉ भालेराव यांच्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेच्या व दिल्ली येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या सुकन्या,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या धनश्री देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या मंडी हाऊस मध्ये नुकताच एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.डॉ.भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ,श्रेष्ठ,आणि विशेषतः टॉपवर असलेल्या,उद्योग व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने देशात व देशाबाहेर ठिकठिकाणी विखुरलेल्या सिनिअर आय ए एस केडरच्या महाराष्ट्रीयन मान्यवरांना एका मंचावर अनौपचारिक रित्या एकत्र आणण्याचा, व त्यांच्या सहवासातून , विचारमंथनातून राज्याबद्दलची अस्मिता जागृत व्हावी; त्यांच्या ज्ञानाचा लाभ पुढील पिढीला व्हावा ' या उदात्त हेतूने आयोजित एक स्तुत्य उपक्रम संपन्न झाला आहे.



यावेळी पहिल्याच उपक्रमाला त्याच तोलामोलाच्या हस्ती लाभत्याची भावना दि असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया" चे संचालक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत भालेराव यांनी व्यक्त करून या सोहळ्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी माजी पथक प्रमुख, ( एन आय ए चे ) विद्यमान महासंचालक सदानंद दाते यांना सन्मानित करण्यात आला.यावेळी केंद्रिय क्रीडा विभागाच्या माजी सचिव, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या माजी प्रादेशिक उप महासंचालक तथा लोकसेवा आयोग्याच्या विद्यमान सदस्या सुजाता चतुर्वेदी,न्यूयॉर्क मध्ये भारतीय कौन्सिल जनरल ज्ञानेश्वर मुळे,तामिळनाडूतील सेक्रेटरी श्री खाडे,सतिषकुमार घोरमाडे,शालेय शिक्षण सचिव आनंदराव पाटील,आदि अत्युच्च पदावर कार्यरत असलेल्या अडीचशे मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती होती.


यावेळी नगर दक्षिणचे खा.निलेश लंके,नाशिकचे खा.भास्कर भगरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,येथील रेणुका परिवार सदस्य डॉ अरविंद पोटफोडे, हेही उपस्थित होते.राज्याच्या तमाम जनतेचे आवडते सिने अभिनेते अशोक सराफ यांना २६ में रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचेही कौतुक या उपक्रमात करण्यात आले .पद्म पुरस्काराचे वितरण होण्याच्या पूर्वसंध्येलाच, " एक उजाड संध्याकाळ " सिने अभिनेते अशोक सराफ यांचे बरोबर गप्पा टप्पा मारत विविध प्रश्न उत्तराची देवाणघेवाण करत संवाद साधण्यात आला.समाजिक कार्यकर्त्या धनश्री देशमुख यांनी उत्तम सुत्रसंचलन करून आभार मानले.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या