मुंबईतील म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना भाडे मिळणार - संजीव जयस्वाल

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केला आहे.तसेच बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० ते २५० चौरस फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाश्यांकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्याचे निर्देशही मंडळास दिले आहेत.


मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये सुमारे २४०० भाडेकरू/रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबीरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मंडळाकडे फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबिरांतून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर भाडेकरू/रहिवासी यांच्या जीवितास धोका पोहचू नये व त्यांची मुंबईत इतरत्र निवासाची पर्यायी व्यवस्था देणे आवश्यक असल्याने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर निर्णय घेतला आहे.


वरील दोन्ही प्रकारे होणारा खर्च सदर इमारतीच्या जागेवर पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना विकासासाठी दिल्यास सदर विकासकांना ज्या दिवसापासून मंडळामार्फत प्रति माह रू. २०,०००/- भाडे अदा करण्यात आले आहे अथवा बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० चौ. फुट ते २५० चौ. फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे भाडयाने घेतलेले आहे त्याचा देखभालीसह संपूर्ण खर्च विकासकाने व सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी भरणे बंधनकारक राहिल, असाही निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या एकूण १३,०९१ आहे. मंडळाकडे एकूण २०,५९१ संक्रमण गाळे आहेत.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या