Prostarm Info System Limited IPO: कंपनीचा आयपीओ आजपासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. ' या' प्रिमियम दराने विकला जात आहे शेअर

प्रतिनिधी: अखेर प्रोस्टार्म इन्फो सिस्टिम लिमिटेड कंपनी (Prostarm Info System Limited Company) आयपीओ आज सूचीबद्ध (Listed) झाला आहे. बीएससी (BSE) वर आज सकाळी हा समभाग (Stock) नोंदणीकृत झाला. ग्रे मार्केटमध्ये या समभागाची (Share) ची किंमत १०५ रूपयांवर अतिरिक्त १५ रुपये प्रिमियम दराने विकली जात असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एनएससीवर हा समभाग सूचीबद्ध झालेला असून १२० रुपयांच्या मूळ किंमतीहून १४ रुपये प्रिमियम दराने हा ग्रे मार्केटमध्ये विकला जात आहे असे अहवालात म्हटले गेले होते.


१६८ कोटींचा आयपीओ (IPO) २७ ते २९ मे पर्यंत बाजारासाठी खुला करण्यात आला होता.अखेर ३० मे रोजी समभागांचे वाटप गुंतवणूकदारांना करण्यात आले होते. या आयपीओचा प्राईज बँड (Price Band) (शेअर्सची किंमत) १०५ रुपये प्रति शेअर्स अशी निश्चित करण्यात आली होती. यामध्ये ३० टक्के वाटा अँकर गुंतवणूकदारांसाठी व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors) साठी २० टक्के वाटा, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) साठी ३५ टक्के वाटा निश्चित करण्यात आला होता.या आयपीओला गुंतवणूकदारांचा अनपेक्षित पाठिंबा मिळाला आहे. एकूण आयपीओतील ९७.२० टक्के वाटा गुंतवणूकदारांनी खरेदी केला असून सर्वाधिक वाटा गैर संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors) यांनी उचलला आहे. या गुंतवणूकदारांनी तब्बल २२२.१३ पटींनी गुंतवणूक केली तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ३९.४९ टक्के गुंतवणूक केली आहे.


२००८ साली ही कंपनी सुरू झाली होती. डिझाईन, उत्पादन, उर्जा संकलन (Energy Storage) क्षेत्रात ही कंपनी काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीला अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investor) ५० कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये कंपनीला २२.११ कोटींचा करोत्तर नफा (Profit After Tax) प्राप्त झाला होता जो आर्थिक वर्ष २०२३ मधील १९.३५ कोटींच्या तुलनेत अधिक आहे.


कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ६१८.१८ कोटींचे आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर खेळते भांडवल (Working Capital) गरजेसाठी, भूतकाळातील देणी चुकती करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी आणि इतर कारणांसाठी केला जाणार आहे.

Comments
Add Comment

विराट आणि रोहित २०२७ विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील - ट्रॅव्हिस हेड

कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि

ऑनलाइन जुगार, बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी संदर्भात सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या

दिवाळीपूर्वीच कोस्टल रोडच्या लगतची जळमटे केली साफ!

वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती

महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ; माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे.

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)

जामीन न मिळाल्याच्या नैराश्यातून सहा बार डान्सर्सचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! कोल्हापूर: कोल्हापुरातील एका महिला सुधारगृहात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.