Mumbai Crime: धक्कादायक घटना! आधी मुंबईच्या मॉलमध्ये फिरला, अन् थेट तिसऱ्या मजल्यावरुन टाकली उडी

अचानक तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून तरुणाने संपवलं आयुष्य 


मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये सोमवारी सकाळी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या मृत व्यक्तीचं नाव दीपक जोशी (वय 38) असे होते. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन दीपकने आत्महत्या केली. या घटनेनंतर तातडीने पार्कसाईट (Parksite) पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन दीपकचा मृतदेह ताब्यात घेतला. दिपक जोशी हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्याच तणावाखाली त्यांनी मॉलवरून उडी मारत आत्महत्या केलीय. याप्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.



सोमवारी सकाळी ११.३० ची घटना


मॉलमध्ये सोमवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपक जोशी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे थरारक दृश्य पाहून मॉलमधील दुकानदार आणि ग्राहकांना धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११. ३० च्या सुमारास मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले. मात्र, थोड्यावेळातच सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला लॉबीत एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. त्या तरुणाचं डोकं फुटलं होतं आणि त्यामधून रक्तस्राव सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिली.



दीपक घाटकोपरच्या काम लेनमधील बारोटवाडी येथे राहतात. दीपकच्या घरी त्याचे आई-वडील आणि पत्नीसह राहत होता. दीपकचा मुलगा कच्छमध्ये त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि तिथे शिकतो. दीपक हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दीपकने यापूर्वी दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहितीसुद्धा समोर आली आहे.


बारोटवाडीतील रहिवाशांनी सांगितलं की, दीपक लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. तो शक्य त्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. १० वर्षांपूर्वी बनावट नोटा छापल्याप्रकरणी दीपकलाही पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय कर्ज घोटाळा आणि अनेक आर्थिक घोटाळ्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याचे वडील लहानसहान कामं करायचे. तर आई लोकांच्या घरी स्वयंपाक करायची. दीपक जोशी याची बायको कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावण्यासाठी बायको लहान मुलांना सांभाळण्याचे काम करत होती. मात्र, दीपकला झटपट आणि खूप पैसा कमवायचा होता. याआधीही त्याने वाशी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र मच्छिमारांनी त्याला वाचवले होते. दरम्यान जोशी यांनी टोकाचं पाऊल अजून कोणत्या कारणाने उचललं त्याचे दुसरे काही कारण आहे का, कोणत्या कारणामुळे ते मानसिक तणावाखाली होते याचा पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र

'मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करू'

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे)