"मला काही झालं तर कोणालाच कळणार नाही..." उषा नाडकर्णीनी व्यक्त केली खंत

मुंबई: अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटात आपल्या अनोख्या शैलीद्वारे प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांना कोण नाही ओळखत? उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. मात्र, अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या उषा ताई उर्फ आऊना एका गोष्टीची प्रचंड भीती वाटते आहे. त्यांनी अलीकडेच ही भीती सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अंकीता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैनकडे बोलून दाखवली.

अंकिता लोखंडेच्या ब्लॉगमध्ये उषा ताईंनी एकटेपणाची खंत व्यक्त केली आहे. पवित्र रिश्ता फेम अंकिताने ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घरी बोलावलं होतं. त्यावेळी तिने त्यांच्यासोबत एक ब्लॉग शूट केला. यावेळी त्यांनी पवित्र रिश्ताच्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. यादरम्यान उषा ताई यांना रडू कोसळले.

उषा ताई म्हणाल्या, 'मी घरी एकटीच असते. मला कधी-कधी फार भिती वाटते की, मला काही झालं तर कोणालाच कळणार नाही. माझ्या भावाचं निधन झालंय. त्याला माहिती असंत तर तो धावत माझ्यासाठी आला असता. परंतु मी आता माझं दु:ख कोणाला सागू.,...' असं म्हणत त्या रडू लागल्या. यावेळी विकी जैन आणि अंकिता भावुक झाल्याचं पहायला मिळालं. उषा नाडकर्णीचा हा भावुक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी उषा ताईंचे अंकिताने सांत्वन केले, त्यांना धीर देत त्यांच्या हिम्मतीला दाद देखील दिली. ती म्हणाली, 'आई खूप मजबूत आहे. ती इतक्या वर्षांपासून एकटी राहते. ती खरच खूप स्ट्रॉग आहे.' दरम्यान अंकिताच्या ब्लॉगमध्ये उषा नाडकर्णी आणि अंकिता खूप गप्पा मारताना दिसत आहे. जुन्या आठवणी त्या एकमेकींसोबत शेअर करत आहेत. यावेळी सुशांत सिंगची आठवण देखील काढण्यात आली. अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपुतसोबत २००९ मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची