Accident News: गाडी चालवताना आली फिट! रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाला चिरडत गेला डंपर

  55

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू तर एक जखमी, दहा वाहनांना देखील चिरडलं


चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एका भीषण अपघाताची नोंद झाली आहे, या अपघातात एका भरधाव गाडीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दहा वाहनांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात चालकाला  फिट (Epileptic Attack) आल्यामुळे झाल्याची समजते.  चंद्रपूर येथील तुकुम -ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडला.


सामान्यतः अपघात  ट्राफिक, वाहनांमधील तांत्रिक बिघाड, तसेच जर वाहन चालकाने मद्यपान केले असेल, किंवा गाडी नियंत्रणाबाहेर गेली असेल त्या कारणाने होत असतात.  मात्र, हा अपघात वेगळ्याच कारणाने झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हायवा चालकाला फिट आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे.



फुटपाथवरील नागरिकांना धडक, एका तरुणीचा मृत्यू तर एक जखमी 


अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली, तसेच या अपघातामध्ये हायवानं दहा वाहनांना देखील चिरडलं आहे. या अपघातामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारी लक्कडकोट येथील रहिवासी असलेल्या सानिका कुमरे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुणी जखमी झाली आहे, जखमी तरुणीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



दहा वाहनांना देखील उडवलं


हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली,  तसेच, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या हायवानं दहा वाहनांना देखील उडवलं आहे, या घटनेत या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.