Indigo News : रांचीमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात

  70

४० मिनिटे हवेत अडकली Flight


रांची: रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने (Bird Hit IndiGo plane) विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. हे विमान पटणा वरुण रांचीकडे येत होते. या विमानात १७५ प्रवासी प्रवास करत होते. रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर फ्लाइट- ६ ई ६१५२ उतरत असताना ही घटना घडली. पक्षी विमानाच्या पुढच्या भागावर आदळला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. पक्ष्याच्या धडकेची माहिती मिळताच, विमानतळ प्राधिकरणाची टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही याची खात्री करण्यासाठी तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.




४ हजार फूट उंचीवर विमानाला धडकला पक्षी


मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान सुमारे ४ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना एका गिधाडाला धडकले. त्यानंतर पायलटने तातडीने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग यशस्वी झाले. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या या विमानात सुमारे १७५ प्रवासी होते. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.




नेमकं काय झालं?


बिरसा मुंडा विमानतळ संचालक आरआर मौर्य यांनी पीटीआयला सांगितले की, रांचीजवळ इंडिगोच्या एका विमानाला पक्ष्याने धडक दिली. ही घटना घडली तेव्हा विमान येथून सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर, सुमारे ३ ते ४ हजार फूट उंचीवर होते. हे इंडिगो विमान पाटण्याहून रांचीला येत होते. गिधाडाने विमानाला धडक दिल्याने विमानाचे नुकसान झाले आहे. अभियंते नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. ही घटना दुपारी १.१४ वाजता घडली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या