शरद पवारांचे निष्ठावंत अजित पवारांच्या गटात जाणार! कोण आहे 'हा' नेता?

हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडणार, हातात घालणार अजित पवारांचे घडयाळ! 


हिंगोली: गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीची प्रकरणं प्रचंड पाहायला मिळाली. सर्वप्रथम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही काका शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या पक्षाचे सीमोल्लंघन करत आपला नवा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. त्यानंतरच्या काळातही बरेच नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सामील झाले. अशातच आता शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हिंगोली येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत नेते अनिल पतंगे (Anil Patange) अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही शरत पवारांची साथ सोडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना हिंगोलीतून हा सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत.



"शरद पवार यांच्यावर कोणती नाराजी नाही"


अनिल पतंगे यांनी शरद पवारांची साथ का सोडणार या प्रश्नावर बोलताना सांगितले की, ‘शरद पवार यांच्यावर आमची कोणतेही नाराजी नाही. मात्र काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मागील १० वर्षापासून आम्ही सातत्याने विरोधात बसतोय. याचा परिणाम विकास कामावर होत आहे, त्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.’



८ जूनला पक्षप्रवेश होणार


दिनांक ८ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल पतंगे पक्षप्रवेश करणार असल्याचं समजत.  अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना अनिल पतंगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही ८ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.’

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

'उद्धव ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले' फडणवीसांची मार्मिक टिप्पणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: