जिल्ह्यातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक

वर्षभरात १३५ तक्रारी दाखल, १३ प्रकरणांमध्येच झाला समेट


अलिबाग : दोन विवाहित लोकांमध्ये कायदेशीररित्या त्यांचे वैवाहिक संबंध तोडण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. तसेच वैष्णवी सारख्या अनेक हुंडाबळी प्रकरण घडत असून कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी झुंज द्यावी लागत आहे.


काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाले तर काहीच संसार वाचू शकतो. अथवा ती महिला शाररिक व मानसिक छळापासून वाचू शकेल. यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. अत्याचार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाईकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे.



जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १०४ जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती १३ जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.तसेच महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या