Stock Market Update: अर्थव्यवस्थेवर जागतिक दबाव कायम ! सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी पडझड सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' कोसळला

प्रतिनिधी: अमेरिकेन शेअर बाजाराने आयातीवरील निर्बंधानंतर शुक्रवारी मोठ्या अंकाने उसळी घेतली. त्याचाच परिपाक म्हणून आज सकाळच्या सत्रात बीएससी व एनएससी बाजारात मोठी पडझड झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाव्यतिरिक्त तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वरील तज्ञांच्या भविष्यवाणीचा परिणाम आज सत्रात पहायला मिळत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ६३५.११ अंशाने व निफ्टी ५० हा १७०.८५ अंशाने घसरला आहे.

आज सकाळी गिफ्ट निफ्टी निर्देशांक देखील घसरला होता. तज्ञांनी या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन निर्देशांक आटोक्यातच राहण्याचे भाकीत केले होते. नुकत्याच भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाने तरतुदी आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार आगामी आर्थिक वर्ष २०५-२६ मध्ये ६.५ टक्के जीडीपी दरवाढ राहील असे मत तज्ञांनी मांडले होते.



मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत यंदा बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे या तिमाहीतील जीडीपी दरवाढीत घट झाली होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील चौथ्या तिमाहीत ९.२ टक्क्यांवरुन घसरत या वर्षी तिमाहीत ७.४ टक्के दर राखला गेला आहे.जीएसटी संकलनात लक्षणीय वाढ झाली असली तरी बाजारातील दबाव स्पष्टपणे दिसून आला. क्षेत्रीय निर्देशांकात शुक्रवारी घटलेल्या मेटल व आयटी निर्देशांकात पुन्हा एकदा घट झाली आहे. मेटल व आयटीत अनुक्रमे ०.९२ व ०.९५ टक्क्यांनी घट दिसून आली आहे.

कुठल्या समभाग (शेअर्समध्ये) वाढ ?

अस्ट्राझेनेका (१०.६८%), रिलायन्स पॉवर (६.२८%),येस बँक (५.२७%), स्टर्लिंग विल्सन सोलार एनर्जी ( ५.४५%) समभागात वाढ दिसून आली.

कुठल्या समभागात घट?

निवा बुपा (९.६४%), एमएमटीसी (७.४%),स्वान एनर्जी (४.१८%), जीआरएसई (३.५६%), हिंदाल्को (६.९६%) समभागात मोठी घट झाली आहे.

सकल देशांतर्गत उत्पादन निर्देशांकात घट झाली असली तरी अपेक्षित आकडेवारीपेक्षा अधिक वाढ निर्देशांकात झाली आहे. परंतु बाजारातील दबाव पाहता बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांचा उत्साह ओसरला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या, नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची