Ranbir Kapoor: आलिया भट्ट पुन्हा प्रेग्नंट? रणबीर कपूरने व्यक्त केली दुसऱ्या मुलीची इच्छा

‘मला दुसरी पण मुलगीच हवी’ रणबीर कपूरने केला खुलासा


रणबीर कपूरने अलीकडेच एका मुलाखतीत त्याला दुसरी देखील मुलगीच हवी आहे असं म्हटलं. तसेच त्याने मोकळेपणाने त्याच्या फॅमिली प्लानिंगबद्दलही सांगितलं,  त्यामुळे आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे का असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. '


बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध स्टार जोडप्यांपैकी एक असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्टला राहा नावाची एक गोंडस मुलगी आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी रणबीर आलियाचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. राहाचे गोंडस फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल देखील होतात, त्यामुळे राहानंतर पुढे काय? राहाला छोटा भाऊ आणणार की बहीण याबाबत अलीकडेच अभिनेता आणि राजकारणी नंदमुरी बालकृष्ण यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधताना रणबीरने अनेक गोष्टींचा खुलासा केला.



व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल शेअर केल्या गोष्टी


यादरम्यान रणबीरने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच त्याने भविष्यातील कुटुंब नियोजनाबद्दलही चर्चा केली. रणबीर कपूरने या मुलाखतीत वडील म्हणून त्याच्या अनुभवाबद्दल आणि अपेक्षांबद्दल मोकळेपणाने सांगितले. ‘मला दुसरीही मुलगीच हवी’ असे तो यादरम्यान म्हणाला.


त्याच्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, रणबीरने त्याच्या वाढत्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आशा व्यक्त केल्या. त्याने खुलासा केला की जर त्याला दुसरं मूल झालं तर त्याला दुसरी देखील मुलगीच हवी आहे. रणबीरची ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



‘मुलीचे सुख आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे’ - राहाबद्दल व्यक्त केल्या भावना


मोठी झाल्यावर राहाला काय व्हावं असं तुला वाटतं असा प्रश्न विचारताच रणबीर म्हणाला की त्याच्या मुलीने आयुष्यात कोणतेही करिअर निवडले तरी तो तिच्या पाठीशी उभा राहील. तो म्हणाला, ‘तिला अभिनेत्री, निर्माती, इलेक्ट्रिशियन, शेफ काहीही बनायचे असेल, मी तिची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करेन. ”  पुढे रणबीरने स्पष्ट केले की त्याच्यासाठी त्याच्या मुलीचे सुख आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे.


रणबीर कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात तो आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तो नितेश तिवारीच्या रामायणमध्ये भगवान रामांची भूमिका साकारतानाही दिसणार आहे, ज्यामध्ये सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, भगवान हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि रावणाच्या भूमिकेत यश हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.