१५ जूनला होणाऱ्या नीट-पीजी परीक्षा स्थगित, सुधारीत तारीख लवकरच

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG २०२५) परीक्षा येत्या १५ जूनला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अतिरिक्त परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने (एनबीईएमएस) उपरोक्त परीक्षा तूर्तास स्थगित केल्या असून लवकरच सुधारीत तारीख जाहीर करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला संपूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षित परीक्षा केंद्रे सुनिश्चित करून एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एनबीईएमएसने न्यायालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधा वाढवण्याकरता काम करत आहे. पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि सुरक्षित केंद्रे कार्यान्वित केली जातील याची खात्री करून परीक्षा एकाच सत्रात आयोजित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा