New Marathi Movie: हिरो सहा, पण हिरोईन एकच! मृण्मयी देशपांडेचा नवा चित्रपट लवकरच

‘मना’चे श्लोक’ चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला


सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची चलती आहे. ज्यात आणखीन एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे ‘मना’चे श्लोक’. या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट मानवी मनाच्या खोल, गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो.  या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक हिरोईन आणि सहा हीरो पाहायला मिळणार आहेत!


या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडिओ पाहता, या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह सहा नायक दिसणार आहेत का? असा प्रश्न पडतो. राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत. आता हे सहाही अभिनेते मृण्मयीचे नायक आहेत का? याचा उलगडा लवकरच होणार आहे.


या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. मृण्मयीने याआधी ही ‘मन फकीरा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून प्रेक्षकांनी ‘मन फकीरा’ ला प्रचंड प्रेम दिले होते.  गणराज स्टुडिओज, संजय दावरा आणि नितीन वैद्य हे तिघेही नावाजलेले निर्माते या निमित्ताने एकत्र आले आहेत.


चित्रपटाबद्दल मृण्मयी देशपांडे म्हणते, “दिग्दर्शक, लेखिका म्हणून हा माझा दुसरा चित्रपट आहे. ही माझ्या मनातलीच गोष्ट आहे, जी मी चित्रपटाच्या माध्यमातून साकारली आहे. यात माझ्यासोबत सहा गुणी अभिनेते आहेत. ज्यांच्यामुळे एक छान टीम जुळून आली आहे. एकंदरीत सगळेच खूप छान जमून आले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.”

Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,