जामखेड कलाकेंद्र गुन्हेगारांचा अड्डा : रमेश आजबे

  58

रंगा- बिल्लाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे राजरोसपणे अवैध धंदे


जामखेड : जामखेडमध्ये सध्या राजरोसपणे अवैध धंदे हे शहरातील पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्या आशिर्वादाने सुरू आहेत. वेश्या व्यवसाय, मटका, गांज्या, अवैध दारू यामुळे परिसरातील तरूण पिढी बिघडत चालली आहे. सतत गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे व्यापारी शहर सोडून चालले आहेत. कालच्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपींना जर आज अटक झाली नाही तर उद्या जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येईल. असे पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी सांगितले.


रविवारी दि. १ रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास जामखेड शहरात लघवी करण्याच्या कारणाने गोळीबार झाला. यात एक जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पाश्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे व जखमी कुणाल पवारचे वडील बंडू पवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, जामखेड शहरात सध्या कलाकेंद्र हे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. कलाकेंद्राला पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणजेच (रंगा) यांच्या आशिर्वादाने कसलीही वेळ नाही रात्रभर नंगानाच सुरू असतो. डिजे चा थयथयाट, परिसरात वेश्या व्यवसाय, हाॅटेलवर सुरू असतो.यामुळे परिसरातील तरूण पिढी बिघडत चालली आहे. व्यापारी शहर सोडून चालले आहेत. शहरासह तालुक्यात शेकडो अवैध हत्यारे आहेत.



अनेक तरूणांकडे अवैध कट्टे आहेत राजरोसपणे दहशत पसरवितात. लवकरच या रंगा बिर्ला ची बदली करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे रमेश आजबे यांनी सांगितले.जामखेड शहरात मुख्याधिकारी अजय साळवे (बिल्ला) यांच्या आशिर्वादाने शहरातील नगरपरिषद गाळ्यात राजरोसपणे अवैध धंदे, मटका, गांज्या सुरू असतो. यास मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. शहरातील संपूर्ण तरूण पिढी बिघडत चालली आहे. लवकरच या अधिकाऱ्याची बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.


शहरात अवैध धंद्यांचा रात्रभर नंगानाच सुरू असतो. यास पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. तरूण पिढी बिघडत चालली आहे. वेश्या व्यवसाय, मटका, अवैध दारू, गांज्या हे राजरोसपणे सुरू आहे. व्यापारी शहर सोडून चालले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी गोळीबाराच्या घटनेतील जखमी कुणाल पवार यांचे वडील बंडू मारूती पवार हाॅटेल व्यावसायिक म्हणाले की, माझा मुलगा कुणाल कामानिमित्त अदित्य पोकळे या मित्राकडे गेला होता. यावेळी एक अनोळखी चार चाकी गाडीतून काही दारूच्या नशेतील अनोळखी व्यक्ती उघड्यावर लघवी करू नका इथे महिला आहेत असे म्हटले याचा राग आल्याने गोळीबार केला यात माझा मुलगा कुणाल पवार जखमी झाला. व पोकळे किरकोळ जखमी आहे. हे सगळे आरोपी नशेच्या आहारी होते. कलाकेंद्रामुळे हे अवैध धंदे सुरू आहेत ताबडतोब अवैध धंदे बंद करावेत.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार