सौदी अरेबिया भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

नवी दिल्ली : भारत आणि सौदी अरेबियामधील संबंध आणखी दृढ होणार आहेत. मोदी सरकारने सौदी अरेबियाला भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणे शक्य व्हावे यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे सौदी अरेबियाला भारतात अधिक गुंतवणूक करता येईल. सध्या सौदी अरेबियातील कंपन्यांचे बरेच पैसे मुकेश अंबानींच्या कंपन्यांमध्येच गुंतवले जातात. पण नियमांतील बदलांमुळे सौदी अरेबियातील कंपन्या भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक करू शकतील.

सध्याच्या नियमांनुसार, जर एखादी परदेशी कंपनी भारतात गुंतवणूक करते, तर तिची वेगवेगळ्या भागांमधून येणारी गुंतवणूक एकच मानली जाते. कंपनीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दहा टक्के निश्चित करण्यात आली आहे. या नियमामुळे सौदी अरेबियाच्या शाही कंपन्या भारतात भारतात जास्त गुंतवणूक करू शकत नव्हत्या. पण भारताने नियमांत केलेल्या बदलांमुळे सौदी अरेबिया भारतातील गुंतवणुकीत वाढ करू शकेल.

भारत सरकारने सौदी अरेबियाच्या पीआयएफला (Public Investment Fund or PIF is Saudi Arabia's sovereign wealth fund / पीआयएफ म्हणजे सौदी अरेबियाचा सार्वभौम संपत्ती निधी ) कठोर नियमातून वगळले आहे. पीआयएफच्या वेगवेगळ्या कंपन्या आता भारतात स्वतंत्र गुंतवणूक करू शकतील. यामुळे त्यांना भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवणे सोपे होईल.

सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा आहे आणि भारताला विकासासाठी तो पैसा हवा आहे. सौदी अरेबियाला भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करायची आहे. 'व्हिजन २०३०' अंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या अर्थव्यवस्थेला तेलावरील अवलंबित्वापासून मुक्त करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाला भेट दिली. या भेटीवेळी दोन्ही देशांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औषध यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. भारत आणि सौदी अरेबिया द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) वर देखील वाटाघाटी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाकडे ९२५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा सार्वभौम संपत्ती निधी आहे. सध्या पीआयएफने भारतात मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये दिड अब्ज अमेरिकन डॉलर आणि रिलायन्स रिटेलमध्ये १.३ अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवले आहेत.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. त्याला तेलाने समृद्ध आखाती देशांकडून दीर्घकालीन गुंतवणूक हवी आहे. त्याच वेळी, सौदी अरेबियाला त्यांच्या 'व्हिजन २०३०' योजनेअंतर्गत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, दोन्ही देशांनी २०२४ मध्ये एक उच्चस्तरीय कार्यदलांची स्थापना केली आहे. सौदी भारतात १०० अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवण्याचे नियोजन करत आहे. या गुंतवणुकीला भारत सरकार करसवलत देणार आहे. यामुळे भारताच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांना मदत होईल.
Comments
Add Comment

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी