Norway Chess : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

ओस्लो : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या छायेत असतानाच हा विजय खेचून आणला. या विजयानंतर मात्र कार्लसने पराभवाचा राग व्यक्त केला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसने जोरात चेस टेबलवर आपला हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



दोन वर्षांत दुसऱ्यांदा, एका भारतीयाने नॉर्वे बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनला हरवून पहिला विजय नोंदवला आहे. आठवड्यापूर्वीच मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळाच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला हार मानण्यास भाग पाडले होते. त्यानंतर गुकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट करत, जेव्हा तुम्ही राजाच्या जवळ जाता तेव्हा अजिबात चुकू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी (दि.१) रात्री उशिरा स्टॅव्हॅन्गर येथे गुकेशने नेमके हेच केले. १९ वर्षीय डी गुकेशने जगातील नंबर १ वर विजय मिळवण्यासाठी ६२ चाली खेळल्या आणि त्याला पराभूत केले. या सामन्यात गुकेशकडून पराभव झाल्यानंतर मॅग्नस कार्लसनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याच वेळी, गुकेश खूप शांत दिसत होता.

कार्लसनने सामन्यात गुकेशवर वर्चस्व गाजवले होते, परंतु शेवटी गुकेशने चाल खेळून त्याला पराभूत केले. त्यामुळे कार्लसन निराश झाला आणि त्याने जोरात आपला हात चेस टेबलवर आदळला. त्यानंतर उभं राहून त्याने गुकेश सोबत हात मिळवला. मात्र यावेळी गुकेश तोंडावर हात ठेवून आश्चर्यचकित होऊन हे पाहत होता. या विजयासह, डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या गुणतालिकेत ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि आता तो कार्लसन आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनापेक्षा फक्त एक गुण मागे आहे.
Comments
Add Comment

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद! २० वर्षीय नेमबाज राणा झाला 'सम्राट'

इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा