देशात ३९७६ सक्रिय कोरोना रुग्ण

  56

२४ तासांत २०३ नवे रुग्ण तर चौघांचा मृत्यू


नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. भारतात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३९७६ झाली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार, गेल्या १० दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ पटींनी वाढ झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १४३५ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र ५०६ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यावर्षी संसर्गामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ३४ झाली आहे.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, मागील दिवसाच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २०३ ची वाढ झाली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आश्वासन दिले होते की, केंद्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.आमचा केंद्रीय आरोग्य विभाग आणि आयुष मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि सर्व राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आरोग्य आणि आयुष सचिव तसेच इतर संबंधित मंत्र्यांशी बोललो आहोत. मागील कोविड-१९ लाटेदरम्यान विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू आहे.



गेल्या चोवीस तासांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये सोमवारी १८ वर्षीय गर्भवती मुलगी आणि एका ४७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी रविवारी दिल्लीत २२ वर्षीय मुलगी आणि तामिळनाडूमध्ये २५ वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.सतत वाढणाऱ्या रुग्णांमुळे, सरकारने एक सार्वजनिक सुचना जारी केली आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे, शारीरिक अंतर राखण्याचे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप, खोकला, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तत्काळ चाचणी करण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

ISRO News : गगनयान अंतराळात झेपावणार, ISRO कडून तारीख जाहीर, काय आहे नवीन अपडेट?

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी देशवासीयांसाठी एक मोठी आनंदवार्ता दिली आहे. भारताच्या

संसदेत घुसखोरीचा प्रयत्न, भिंत ओलांडून गरुडद्वारापर्यंत पोहोचलेल्याला अटक

नवी दिल्ली : नव्या संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला. एक व्यक्ती भिंत ओलाडून गरुडद्वारापर्यंत पोहोचली. अखेर सुरक्षा

SC on Stray Dogs : श्वानप्रेमींचा विजय! भटक्या कुत्र्यांना कैदेतून सुटका पण कडक अटींसह...काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

नवी दिल्ली : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै

आयपीएस सतीश गोलचा यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी

नवी दिल्ली: तिहार तुरुंगाचे महासंचालक सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जीएसटीच्या ५ टक्के, १८ टक्के स्लॅबना मान्यता

जीएसटी परिषद मंत्री गटाचा सर्वसामान्यांना दिलासा आता ४ ऐवजी २ स्लॅब नव्या कर स्लॅबला मंत्रीगटाची मान्यता