प्राचीने केला पर्दाफाश, म्हशीलकरसारख्यांना चपराक

मुंबई :  मराठमोळी अभिनेत्री प्राची पिसाट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे… कारणही तसंच आहे! ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला पाठवलेले अश्लील मेसेजेस तिने धाडसानं उघड केलेत. प्राचीने ‘मेसेजेस व्हायरल करू नकोस’ असे सांगणा-यांचंही न ऐकता तिनं स्क्रीनशॉट्स समाजासमोर आणले… पण प्रश्न असा आहे.. प्राचीने धाडस केलं, पण आपण अशावेळी काय करतो? झाकतो, चुकवतो की थेट भिडतो?



ज्येष्ठ अभिनेता सुदेश म्हशीलकर यांनी अभिनेत्री प्राची पिसाटला ‘सेक्सी’, ‘फ्लर्ट करू वाटतंय’ अशा खालच्या पातळीवरचे घाणेरडे मेसेज पाठवले. प्राचीने ते थेट सोशल मीडियावर उघड करताच खळबळ माजली. त्याआधी अनेकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. तिच्या जवळच्यांनीही ‘नको व्हायरल करू’ म्हणून मन वळवायचा प्रयत्न केला. पण प्राची डगमगली नाही. तिनं ते स्क्रीनशॉट शेअर करत म्हशीलकरसारख्या विकृतांना धडा शिकवला. पण प्रश्न असा, ही हिंमत सगळ्यांमध्ये असते का?

म्हशीलकर हे टीव्ही-मालिकांमध्ये वडीलधारी भूमिका करणारे ‘संस्कारमूर्ती’. पण त्यांनी प्राचीला जी भाषा वापरली, ती त्यांच्या प्रतिमेला काळिमा फासणारी होती. स्क्रीनशॉटमध्ये त्यांनी ‘तुझा नंबर दे’, ‘फ्लर्ट करावंसं वाटतंय’, ‘खूपचं सेक्सी दिसतेस’ असं म्हटलं. या मेसेजस्मुळे सोशल मीडियावर अक्षरशः आग लागली. लोक संतापले. म्हशीलकर ट्रोल झाले. सगळं उघड झाल्यावर त्यांनी सुरुवातीला पोस्ट्स डिलिट केल्या, मोबाईल बंद केला, आणि गायब झाले. त्यानंतर पाच दिवसांनी एक पोस्ट टाकून म्हणाले, “माझा अकाउंट हॅक झाला होता.” आणि वर सांगायला लागले की, सेक्सी म्हणावं अशा माझ्या मैत्रिणी आहेत. अशा व्यक्तींना खरंच समाजात ‘ज्येष्ठ’ का म्हणावं? आणि हे सगळं झाल्यावर बोलण्याचा काय उपयोग? प्रतिष्ठेचा प्रश्न तर केव्हाच मातीमोल झालाय. घरात बायका, सुना, नातवंड असूनही तरुण मुलींमध्ये सेक्स अपील शोधणारे हे वयस्कर विकृत लोक समाजात मोकाट फिरतात, हे दुर्दैवं नाही का?
कधी काळी अशा मेसेजसाठी पत्रं, भिंतींवर निनावी मजकूर असायचा. आता तोच विकार मोबाईलमध्ये शिरलाय. पण आता महिलांकडे आहे एक शस्त्र.. स्क्रीनशॉट.

यापूर्वी ‘मी टू’मध्येही अशी शेकडो प्रकरणं बाहेर आली. आलोकनाथपासून अनेक सीनिअर मंडळींचा खरा चेहरा समोर आला. प्राचीसारख्यांनी आवाज उठवला, म्हणून हे चेहरे उघडे पडताहेत. पण प्रत्येक प्राचीला समाजानं साथ दिली पाहिजे. तुमच्याही आजूबाजूला एखादा "म्हशीलकर" आहे का?मग फक्त प्राची बघू नका... तिच्यासारखं व्हा. कारण, भीतीनं शांत बसणं म्हणजे अशांचा पाठिंबा वाढवणं. प्राचीनं दाखवलेलं धाडस प्रत्येक स्त्रीला स्फूर्ती देणारं आहे. पण प्रश्न उरतो तो आपल्यावर... जेव्हा अशी घटना आपल्या समोर घडते, तेव्हा आपण काय करतो? गप्प राहतो की आवाज उठवतो? कारण फक्त प्राचीला नाही, आपल्या प्रत्येकाला आता ठामपणे, धाडसानं म्हणायचं आहे – Enough is Enough!
Comments
Add Comment

बिल गेट्स यांची हिंदी टीव्हीवर एन्ट्री! ‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ मध्ये करणार खास कॅमिओ

Bill Gates: हिंदी मनोरंजन विश्वातून एक भन्नाट बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात

"लिट्ल दीपिकाचा" फर्स्ट लुक पाहिलात का ? दीपिका-रणवीरने पहिल्यांदाच मुलगी ‘दुआ’चे फोटो केले शेअर.

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एका गोंडस कन्येचे आई-बाबा

संजय दत्तची लेक इकरा आहे हुबेहूब आजी नरगिस दत्त यांची 'कार्बन कॉपी'!

११ व्या वाढदिवसाच्या फोटोंवर चाहत्यांकडून 'कार्बन कॉपी' म्हणत कौतुकाचा वर्षाव मुलगा शाहरान आणि मुलगी इकराच्या

शाहरुख खानच्या मन्नतवर दिवाळी का साजरी झाली नाही ? जाणून घ्या कारण

मुंबई : दिवाळी निमित्त दरवर्षी शाहरुख खान आपल्या मन्नत वर दिवाळी पार्टीचं आयोजन करत असतो. या भव्यदिव्य पार्टीला

‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie: ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर निर्माती क्षिती

इंडियन आयडॉल नंतर रोहित राऊत पुन्हा एकदा एका गायन स्पर्धेत होणार सहभागी

मुंबई : सारेगमप लिटिल चॅम्प्स या स्पर्धेमुळे रोहित घराघरात पोहोचला. या शो यामध्ये तो फायनलिस्ट ठरला होता. यानंतर