अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाची विवाहासाठी आचारसंहिता जाहीर 

  52

अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजात जागरुकता वाढली असून, अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत विवाह समारंभांसाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या संहितेनुसार हुंडा घेणे-देणे, डीजे लावणे, आणि प्री-वेडिंग शूट्स यावर बंदी घालण्यात आली आहे.


बैठकीचे आयोजन एन. बी. धुमाळ फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित नेते, संस्था प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


बैठकीनंतर तनपुरे महाराजांनी सांगितले की, समाजातील अनिष्ट प्रथा मोडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदल करावा. आचारसंहिता योग्य प्रकारे राबवण्यासाठी तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात येणार आहेत.


डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले की, विवाह विषयक जनजागृतीसाठी कीर्तनकार आणि प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. तर चंद्रकांत गाडे यांनी सांगितले की, विवाहाच्या वेळी मुलींकडून खूप अटी आल्यामुळे अनेक मुलांचे विवाह लांबणीवर पडतात, त्यामुळे पालकांनीही अपेक्षा कमी करायला हव्यात.



आचारसंहितेचे महत्त्वाचे मुद्दे:



  • विवाह समारंभ १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीतच करावा.

  • पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांचा वापर करावा, डीजे वापरू नये.

  • प्री-वेडिंग शूट बंद करावं.

  • लग्न, वाढदिवस, उद्घाटन समारंभात साड्या किंवा भेटवस्तू देऊ नयेत.

  • हुंडा घेऊ नका, देऊ नका.

  • लग्न, साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी पार पाडावेत.

  • दशक्रिया आणि तेराव्याच्या कार्यक्रमांत भोजनावळ बंद करावी.

Comments
Add Comment

निरोप समारंभात गाणे गाणं महागात पडलं, तहसीलदार प्रशांत थोरात यांचे तात्काळ निलंबन

नांदेड: तहसीलदार प्रशांत थोरात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची बदली लातूर

गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश करण्याबाबत जयंत पाटील यांचे राज्यपालांकडे निवेदन

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने