उत्तर भारतात उष्णतेची लाट, नागरिक पाहताहेत पावसाची वाट

लखनऊ : केरळमध्ये ८ दिवस आधी आणि महाराष्ट्रात तब्बल १२ दिवस आधी मान्सून बरसलाय. मात्र उत्तर भारतातील यूपी, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील लोकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. उष्णतेच्या लाटेने हैराण झालेले उत्तर भारतीय चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहताहेत. मग मान्सून उत्तर भारतात कधी धडकणार? उत्तर भारतीय कधी सुखावणार? चला तर जाणून घेऊयात हवामान विभागाचा ताजा अंदाज.


यंदा मान्सूनने सर्वांनाच चकित केलंय. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला पाऊस अवघ्या सहा दिवसांत अन्य १७ राज्यांमध्ये पोहोचला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड आणि ईशान्य भारतातील त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, मेघालय, आसाम, सिक्कीम या राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झालाय. यंदा आतापर्यंत ३३ टक्के जास्त पाऊस झालाय, मात्र आता बंगालच्या उपसागरातील झालेल्या बदलामुळे मान्सूनचा वेग मंदावल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

दुसरीकडे उत्तर भारतात अद्याप उष्णतेची लाट आहे. त्यामुळे उत्तर भारतीय उकाड्याने हैराण झाले आहेत. आहे. यूपी, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात नागरिक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. कधी एकदा पाऊस बरसतोय याची आतुरता वाढलीय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात झालेल्या बदलामुळे उत्तर भारतात मान्सून सात ते दहा दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे.


 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये दहा जूनच्या सुमारास मान्सून येण्याची शक्यता आहे. झारखंड आणि बिहारच्या अनेक भागात १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः गोड्डा आणि पाकुड येथे गेल्या गुरुवारी झालेल्या पावसाने याची झलक दाखवली आहे. तर मध्य प्रदेशात १५ ते २० जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात २० ते २५ जून दरम्यान पाऊस दाखल होईल, असा अंदाज आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात २५ ते ३० जून दरम्यान मान्सून बरसण्याची शक्यता आहे. तर राजस्थानात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये १ आणि २ जूनला प्रतिसात ५० - ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र पावसाला उशीर होत असल्याने काही प्रमाणात चिंताही वाढलीय. यूपी, बिहार, आणि मध्य प्रदेशातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मान्सूनचा पाऊस उत्तर भारतात थोडा उशिरा येत असला, तरी त्याचं स्वागत करण्यासाठी उत्तर भारतीयांनी सज्ज असायला हवं. यूपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि दिल्लीत लवकरच पावसाच्या सरी बरसणार आहेत.
Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर