ऐतिहासिक : NDA मधून एकाचवेळी १७ मुली सैन्यात दाखल

  37

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये शुक्रवारी इतिहास घडला. अधिकारी म्हणून सैन्यदलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला बॅचच्या सतरा कॅडेट्स एनडीएतून खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. या काळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेक शारीरिक, मानसिक आव्हानांना सामोरे गेल्या. एनडीएतील हा दीक्षांत समारंभ म्हणजे अवघ्या भारतासाठी हा क्षण अभिमानाचा होता. विशेष म्हणजे ७५ वर्षांचा इतिहासात प्रथमच मुला- मुलींचे दीक्षांत संचलन एकत्रित पार पडले.



सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या निकालानंतर मुलींसाठी एनडीएचे दरवाजे पंचाहत्तर वर्षांनी प्रथमच खुले झाले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवत देशभरातून १९ मुलींची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. यातील १७ कॅडेट्सनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण ३३९ कॅडेट पदवी घेऊन लष्कर, नौदल आणि हवाईदलात थेट अधिकारीपदावर नियुक्त होणार आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने गुरुवारी पदवी प्रदान केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुण्यातील एनडीएच्या मैदानावर मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. सिंग यांच्या उपस्थित १४८ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. ऐतिहासिक पासिंग आउट परेडमध्ये मुली व मुलांनी पथसंचलन केले. मुलांच्या बरोबरीने या मुलींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या परेडमध्येही मुलांच्या इतकाच जोश, ताकद अन् उत्साह मुलींमध्ये दिसला. हा प्रसंग अनुभवताना मुलींच्या आई-वडिलांसह प्रत्येकांचा उर देशाभिमाने भरून आला. मुलींच्या पहिल्या तुकडीचा कॅडेट असल्याचा अभिमान वाटतो,. आई - वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना मुलींनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ, एनडीएचे प्रमुख व्हाॅइस अ‍ॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी तयार करता यावेत या उद्देशानं एनडीएची स्थापना पुण्यातील खडकवासला इथं 8 जून 1949 ला झाली. त्यानंतर त्यानंतर ७५ वर्षांनंतर सर्व मुली तीन वर्षांचे खडतर परिश्रम पूर्ण करीत आज देशाच्या सैन्यदलात अधिकारीपदावर रुजू होण्यास सज्ज झाल्या. एनडीएमध्ये प्रवेश मिळवण्यापासून ते येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण . या आव्हानांना सामोरे जात सगळ्या जणींनी यशाला गवसणी घातलीय. यशाने पुढे जाण्याचा नवा आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही सर्व जणींनी तीन वर्षे एकत्रित प्रशिक्षण घेतले. आम्ही सर्व जणींनी एकमेकांना प्रोत्साहित केले. आम्ही सगळ्या जणी बहिणी आहोत. प्रत्येकीने यशाचे शिखर गाठल्याचा आनंद आहे. मी पुढे नौदलात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया हरसिमरन कौर हिनं व्यक्त केली.
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची