भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट!

सचिन, पारुल चौधरीची रौप्य पदकाला गवसणी


नवी दिल्ली : पारुल चौधरीने महिलांच्या ५००० मीटर प्रकारात १५:१५.३३ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. तिने यापूर्वी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत यापूर्वी २०१९ मध्ये कांस्य आणि २०२३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे ती तीन पदके या प्रकारात जिंकणारी भारताची पहिलीय खेळाडू ठरली आहे. दरम्यान शनिवारी महिलांच्या ५००० मीटर प्रकारात १४:५८.७१ सेकंद वेळ नोंदवत कझाकस्तानच्या नोरा जेरुतो तानुईने सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या युमा यामामोटोने १५:१६.८६ सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. तसेच आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत अनिमेश कुजूरने पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडत कांस्य पदक जिंकले आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच भारताला २०० मीटर प्रकारात पदक मिळाले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये धर्मवीर सिंगने भारतासाठी पदक जिंकले होते. अनिमेशने २०.३२ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले आहे. या प्रकारात जपानच्या तोवा युझावाने २०.१२ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तर सौदी अरेबियाच्या अब्दुल्लाझिज अब्दु अताफीने २०.३१ सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले.



तसेच भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू सचिन यादवने शानदार कामगिरी करत २६ व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. २५ वर्षीय सचिनने ८५.१६ मीटर भालाफेक करत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. तर पॅरिस ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीमने ८६.४० मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आता ८ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह २४ पदके जिंकली आहेत. भारताचा सचिन यादव सुरुवातीला पदकांच्या शर्यतीतून बाहेर होता, परंतु त्याने ८३.०३ मीटर आणि शेवटच्या २ थ्रोमध्ये ८५.१६ मीटरसह रौप्यपदक जिंकले. सचिन व्यतिरिक्त, यशवीर सिंगने ८२.५७ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम फेकसह पाचवे स्थान पटकावले आहे.



विथ्या रामराजला कांस्य : महिलांच्या ४०० मीटर हर्डल प्रकारात भारताच्या विथ्या रामराजने ५६.४६ सेंकद वेळ नोंदवत कांस्य पदकावर नाव कोरले. या प्रकारात चीनच्या मो जियाडिएने ५५.३१ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर बहरेन ओलुवाकेमी मुजीदत अडेकोयाने ५५.३२ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी विथ्या पाचवी भारतीय महिला खेळाडू आहे.


पुजाला कांस्य : महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत भारताच्या पुजाने २:०१.८९ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. हे तिचे या प्रकारात सर्वोत्तम कामगिरीही आहे. तसेच हे तिचे यंदाच्या स्पर्धेतील दुसरे पदकही आहे. ८०० मीटर प्रकारात चीनच्या वू हाँगजिओने २:००.०८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. जपानच्या रिन कुबोने २:००.४२ सेकंद वेळेसह रौप्य पदक जिकंले. पुजाने याआधी १५०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.


रिलेमध्ये भारताला रौप्य यश : महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदक जिंकेल. भारताच्या संघात श्राबणी नंदा, स्नेहा शनुवल्ली, अभिनया राजराजन आणि नित्य गांधे यांचा समावेश आहे. भारतीय संघाने ४३.८६ सेकंद वेळ नोंदवत रिलेमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत चीनच्या संघाने ४३.२८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले आहे. थायलंडच्या संघाने ४४.२६ सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या