कांदिवलीत सोमवारी पाणीब्लॉक

मुंबई (खास प्रतिनिधी) : कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलिमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलिमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे. या कालावधीत म्हणजे सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे.



दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत कांदिवलीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



या विभागांत पाणीपुरवठा बंद


आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) ( २ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

Comments
Add Comment

स्थानिक निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' नाही!

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; नियमात तरतूद नसल्याचे स्पष्टीकरण, विरोधकांना मोठा झटका मुंबई: महाराष्ट्र

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित