National Highway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात आज, शनिवारी एक गाव प्रवासी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मेंढवण खिंडीच्या उतारावर सकाळी ११.३० वाजता मनोर गेट हॉटेल समोर हा अपघात झाला. यामध्ये ग्लोरिया वेल्स (वय ७३), क्लेटन वेल्स (वय ४३) आणि फॅबीओला वेल्स (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तर हेनान वेल्स (वय ६३) आणि रेडन वेल्स (वय ९) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




यासंदर्भातील माहितीनुसार आज, शनिवारी सकाळी ११.३० वाजता डस्टर कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर काँक्रीटच्या रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु होते. त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक आपत्कालीन ब्रेक दाबला. त्यामुळे भरधाव वेगाने आलेल्या डस्टर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या वाहनाला जाऊन धडकली. त्याचवेळी कारच्या पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर ट्रकने डस्टर कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चेदामेंदा झाला. अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मनोर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवार-मंगळवारी या ठिकाणी मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)