मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मुंबईत नरिमन पॉईंटच्या भाजपा प्रदेश कार्यालय येथे सोमवार २ जून रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात मंत्री नितेश राणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात वेळ वाया जाऊ नये आणि प्रश्न व्यवस्थित विचारणे सोपे व्हावे यासाठी द्यावयाची निवेदने लेखी स्वरुपात आणावी, असे भाजपाचे पक्ष संघटन आणि शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी सांगितले.