अखेर, आयपीएस जालिंदर सुपेकर यांची आयजी पदावरून उचल बांगडी, गृहविभागाची मोठी कारवाई

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी (Vaishanvi Hagawane Case) अनेक महत्वाचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले असून, संबंधित सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे. मात्र, या प्रकरणात आणखीन एक मोठे नाव समोर येते, ते म्हणजे वैष्णवीचे मामा सासरे IG  जालिंदर सुपेकर (Jalinder Supekar) यांचे. वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांचे नाव येताच,  सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यानंतर आता त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.


पुणे येथील मुळशीत राहणारी विवाहित वैष्णवी हगवणे हिने दिनांक  ६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान, या प्रकरणात वैष्णवीचा पती आणि सासु, सासरे आणि नणंद, दीर अशा सर्वांनाच अटक झाली आहे. तसेच वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या नीलेश चव्हाणला देखील पोलिसांनी अटक केली आहे. यादरम्यान, IG जालिंदर सुपेकर यांचे नाव देखील या प्रकरणात आले होते.


या प्रकरणातील आरोपी शशांक हगवणेचे ते मामा लागत असून त्याला दिलेल्या शस्रपरवान्यावर सुपेकर यांची सही असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे सुपेकर यांचे अतिरिक्त पदभार अलीकडेच काढण्यात आले असताना काल त्यांची थेट आयजी ( पोलीस महानिरीक्षक ) पदावरून होमगार्डमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सुपेकर यांनी डबल फटका बसला आहे.



मामा सुपेकर यांची आयजी पदावरून उचल बांगडी


वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचे हे अतिरिक्त कार्यभार काढले होते.  त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गृहविभागाने आणखीन एक मोठी कारवाई केली आहे.  जालिंदर सुपेकर यांची आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली झाली आहे.



मामा सुपेकरांवर लागला हा ठपका


वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांवरही सुरुवातीपासून आरोप झाले होते. या आरोपानंतर या प्रकरणात आरोपींनी पोलीसांची काही मदत असेल तर चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. या प्रकरणात हगवणे बंधूंना शस्र परवाना देताना नियमबाह्यपणे दिल्याचा ठपका आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. त्यांच्या अर्जावर आयजी जालींदर सुपेकर यांची सही होती. शिवाय ते हगवणे बंंधूंचे मामा लागत होते असे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांची आयजी पदावरुन उचल बांगडी करण्यात आली आहे. आता त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून साईड पोस्टींग दिल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक