Asian Athletics Championships : भारताचं वर्चस्व कायम! गुलवीर सिंगचा ‘डबल गोल्डन धमाका’, तर पूजा सिंगची सोनेरी झेप…

  33

गुमी : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून दाखवलीये. दक्षिण कोरियामधील गुमी येथे सुरु असलेल्या स्पर्धेत चौथ्या दिवसाअखेर भारत ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंचा दबदबा आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. आधी १०,००० मीटर शर्यतीत दमदार कामगिरी करत सुवर्ण जिंकणाऱ्या गुलवीरने आता ५,००० मीटर शर्यतीतही जोरदार मुसंडी मारत दुसरे सुवर्णपदक पटकावले.



आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे पदकाचे खाते गुलवीर सिंहने यानेच उघडले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी त्याने पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सूर्वणपदक जिंकले होते. त्याने ५००० मीटर शर्यतीचेही सुवर्ण नावावर केले. त्याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. त्याचवेळी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली.




गुलवीर हा हरि चंद (१९७५) आणि जी लक्ष्मणन (२०१७) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर हा तिसरा भारतीय ठरला होता. त्याने २८:३८.६३ वेळ नोंदवत सुवर्णपदक नावावर केले होते. २०२३ मधील आशियाई स्पर्धेत त्याने ५००० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. आता त्याने या कांस्यचे रुपांतर सुवर्णपदकात केले. गुरवीरने १३ मिनिटे २४.७७ सेकंदाची वेळ नोंदवरून थायलंडच्या किएरान टुंनिवाटे (१३ मिनिटे २४.९७ सेकंद) आणि जपानच्या नागिया मोरी (१३ मिनिटे २५ सेकंद) यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. याच शर्यतीत भारताचा अभिषेक पाल १३ मिनिटे ३३.५१ सेकंदासह सहावा आला.



गुलवीर ठरला दुसरा भारतीय


एकाच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५००० मीटर आणि १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर सिंग हा इतिहासातील दुसरा भारतीय ठरला आहे.



पूजा सिंगची एतिहासिक कामगिरी


महिला गटात पूजा सिंगने एतिहासिक कामगिरी नोंदवलीये. उंच उडी प्रकारात तिने १.८९ मीटर उंचउडी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत सुवर्ण पटकवणारी ती दुसरी भारतीय महिला ठरलीये. तिच्या आधी बॉबी अलॉयसियस हिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत पदक जिंकले होते. बॉबीने २००० मध्ये सुवर्ण आणि २००२ मध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती. नंदिनी आगासरा हिने हेप्टॅथलॉन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीये. या क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन आणि सोमा बिस्वास यांच्यानंतर सुवर्ण पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय ठरली.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे