Pune Car Accident: पुण्यात भावे शाळेजवळ भीषण अपघात, भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना उडवलं

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत एका भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. जखमींमध्ये बहुतेक MPSC चे विद्यार्थी असून त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं आहे. तर,  कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्राईम सीन सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, वाहन चालकाने तसेच कारमध्ये असलेल्या इतर सहप्रवाशांनी मद्यप्राशन केले होते का? याची पुष्टी करण्यासाठी संबंधितांचा वैद्यकीय तपास केला जात आहे.



घटनास्थळी नेमकं काय घडलं?


सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास, भवानी पेठेतील श्री नाथसाई अमृततुल्य या चहाच्या टपरीवर MPSC चे अनेक विद्यार्थी चहा घेत उभे होते. त्याचवेळी, भरधाव वेगाने एक खाजगी कार त्या मार्गाने आली, या दरम्यान वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, आणि त्याने थेट विद्यार्थ्यांवर तसेच परिसरातील काही पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात करणाऱ्या कारचा चालक जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) हा कदाचित मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत गाडीत असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) यांच्याविरोधातही तपास सुरू आहे. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



अपघातात 12 जण जखमी


या अपघातात 12 जण जखमी झाले असून, त्यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींना तातडीने संचेती रुग्णालय आणि मोडक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.


विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या ठिकाणी झालेला हा भीषण अपघात, वाहतूक सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करतो आहे. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक