कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार निलेश राणे

कुडाळ : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत दुसरी महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विशेषत:, औद्योगिक वसाहतीतील वाढती वीज समस्या आणि भूखंडांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी तातडीने लक्ष देण्याची ग्वाही दिली.


कुडाळ एमआयडीसीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅकेज जाहीर केले होते या पॅकेजच्या अनुषंगाने एमआयडीसीमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ज्यामुळे एमआयडीसी विकसित होऊ शकते यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसी असोसिएशन सोबत (शुक्रवारी) एमआयडीसी विश्रामगृह येथे बैठक घेतली, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेता संजय आंग्रे, दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी नगराध्यक्ष विनायक राणे तसेच एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर, खजिनदार उदय शिरोडकर, सदस्य आनंद बादीवडेकर, अमित वळंजू, राजन नाईक, विशेष निमंत्रित सदस्य मुश्ताक शेख, प्रमोद भोगटे, सल्लागार शशिकांत चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, कायम निमंत्रित सदस्य संतोष राणे उपस्थित होते.



असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी बैठकीत एमआयडीसीची सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणून वीज पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. नवीन उद्योजकांची वाढती संख्या असूनही अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना उद्योग सुरू करता येत नाहीत. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांनाही आवश्यक वीज न मिळाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून औद्योगिक वसाहतीत नवीन वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन (उपकेंद्र) उभारण्याची गरज असल्याचे होडावडेकर यांनी नमूद केले.


आमदार राणे यांनी या विषयात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून औद्योगिक वसाहतीला विकासाच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण होईल. काही उद्योजकांच्या भूखंडांबाबतच्या प्रलंबित समस्यांवरही यावेळी चर्चा झाली, ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्याबाबत आमदार राणे यांनी ग्वाही दिली. या बैठकीत कुडाळ औद्योगिक वसाहत असोसिएशनच्या वतीने 'इंडस्ट्रियल एक्स्पो २०२६' चे आयोजन करण्याबाबतची संकल्पना असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी मांडली. आमदार निलेश राणे यांनी या संकल्पनेचे स्वागत करत एक्स्पोसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, याबाबतची रूपरेषा ठरवण्यास सांगितले.


आपल्या संबोधनात आमदार निलेश राणे यांनी, आपल्या मतदारसंघातील ही जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने तिचा विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या विकासातूनच स्थानिकांना रोजगार मिळेल असे ते म्हणाले. यापुढील काळात असोसिएशनच्या सहकार्याने आपण यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.



कचरा प्रकल्प करावा लागेल


कुडाळ एमआयडीसी मध्ये नगरपंचायतीने कचरा प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. आपल्या असोसिएशनने त्याला ना हरकत दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चित मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा आजूबाजूच्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. वेंगुर्ले नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा केला जाणार आहे. याला सुद्धा सर्वांची साथ आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात

Devendra Fadnavis and Narayan Rane : वाभाडे काढणं काय असतं, हे राणे साहेबांच्या भाषणातून शिकलो!" - देवेंद्र फडणवीसांनी जागवल्या विधानसभेतील आठवणी

कणकवली : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे (NarayanRane) यांचा ७४ वा वाढदिवस सिंधुदुर्गाच्या भूमीत मोठ्या दिमाखात

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nitesh Rane : सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार - मंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार