अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर राज्य सरकार काढणार चित्रपट, मुख्यमंत्र्यांची घोषणा

अहिल्यानगर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. ती गोष्ट म्हणजे, राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट काढणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.


या कार्यक्रमात बोलताना राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलं. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, एकीकडे अहिल्यादेवी यांचं जन्मस्थळ आहे आणि दुसरीकडे कर्मस्थळ आहे. यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेणार आहे. मात्र पुढच्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी नक्की येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.


दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, अहिल्यादेवी यांनी 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला. छत्रपती शिवरायांनंतर लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचं नाव येतं. भारतात बनलेल्या ब्रम्होसने पाकिस्तानची तळं उद्ध्वस्त केली, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी यांनी बलशाली तोफखाना तयार केला होता, त्यामुळे त्यांच्या राज्यावर कोणीही हल्ला करण्याचं धाडस केलं नाही. औरंगजेबानं सोमनाथ मंदिर तोडलं, त्यावेळी कोणत्याही राजाचं ते मंदिर बांधण्याचं धाडस झालं नाही, मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी त्याच मंदिराशेजारी दुसरं मंदिर उभारलं, पडलेल्या मंदिराचे अवशेष त्यांनी तसेच ठेवले, कारण पाडलेलं मंदिर बघितल्यानंतर हिंदू लोक जागृत होतील, असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं. अहिल्यादेवी यांनी हुंडाप्रथा देखील बंद केली होती, त्यांच्या काळात कोणाचीही हुंडा घेण्याची आणि मागण्याची हिंमत होत नव्हती, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा