LOC ओलांडणाऱ्या नागपूरच्या सुनीता जामगडेवर हेरगिरीचा गुन्हा दाखल

सोशल मीडिया प्रेम प्रकरणात धक्कादायक माहिती उघड


नागपूर : नागपूरच्या सुनीता जामगडे या ४३ वर्षीय महिलेने सोशल मीडियावर ओळख झालेल्या झुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी थेट कारगिलजवळील नियंत्रण रेषा (LoC) ओलांडली. या धक्कादायक कृत्यानंतर तिच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ती २ जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे.


झोन ५ चे डीसीपी निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामगडेने सुरुवातीला व्यवसायाच्या संधी शोधत असल्याचा बनाव केला होता, मात्र तपासादरम्यान तिच्या फोनमध्ये झुल्फिकारशी असलेले वैयक्तिक चॅट्स सापडले आणि खरी कहाणी उघड झाली. ती पाकिस्तानातून संपर्क साधणाऱ्या झुल्फिकारच्या प्रेमात अडकली होती आणि त्याला भेटण्यासाठी मुलासह लडाखच्या हुंडरमन गावात गेली. मात्र, LOC पार करताना तिने मुलाला मागे ठेवले, हे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.



पोलिसांनी खुलासा केला की, जमगडे काही काळ पाकिस्तानच्या ताब्यात होती. ती तिथे काय बोलली, काय सांगितलं याचा तपास अजून सुरू आहे. सध्या तरी तिने कोणतीही संवेदनशील माहिती दिली, याचे ठोस पुरावे पोलिसांना सापडलेले नाहीत.


ही संपूर्ण घटना हेरगिरी की आंधळ्या प्रेमाचा अतिरेक – याचा तपास आता कारगिलमधील घटनांच्या तपशीलातून स्पष्ट होणार आहे. सुनीता जामगडेला पुन्हा हुंडरमन येथे घेऊन जाऊन तिने घेतलेल्या मार्गाचा पुन्हा शोध घेतला जाणार आहे. सोमवारी तिच्या कोठडीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.


हे प्रकरण सध्या नागपूरपासून दिल्लीपर्यंत चकित करणारे बनले आहे – एका प्रेमप्रकरणाने देशाच्या सुरक्षेच्या सीमा किती सहज पार केल्या जाऊ शकतात, याचा हा धडा ठरत आहे.

Comments
Add Comment

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा

Digital 7/12 in Just 15 Rupees : बावनकुळेंचा 'मास्टरस्ट्रोक'! डिजिटल ७/१२ ला कायदेशीर कवच; अवघ्या १५ रुपयांत डाऊनलोड करा अधिकृत उतारा, GR वाचा...

मुंबई : महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका धडाकेबाज