नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’च्या सेटवरून यशचा पहिला लूक

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक असलेल्या रामायणमध्ये आता अ‍ॅक्शन, मायथॉलॉजी आणि भव्यतेचा अफलातून संगम पाहायला मिळणार आहे. या भव्य सिनेमात रॉकिंग स्टार यश ‘रावण’च्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचा पहिला लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या प्रोजेक्टचे निर्माता आहेत नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शन करत आहेत नितेश तिवारी. यश या सिनेमात केवळ मुख्य भूमिकेत नाही, तर ते को-प्रोड्यूसर देखील आहेत. त्यांची निर्मितीसंस्था Monster Mind Creations आणि नमित मल्होत्रा यांची Prime Focus Studios मिळून रामायण साकारत आहेत.

यश सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हॉलीवूडचे अ‍ॅक्शन डायरेक्टर गाई नॉरिस यांच्यासोबत काम करत आहे. गाई नॉरिस हे Mad Max: Fury Road आणि The Suicide Squad यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत आणि आता ते रामायणसाठी अ‍ॅक्शन सीन डिझाईन करत आहेत.

सेटवरून नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये यश फिट आणि युद्धासाठी सज्ज अशा लूकमध्ये दिसत आहेत. त्याचा हा ट्रान्सफॉर्मेशन एक वेगळाच रावण समोर आणतो – असा रावण जो ताकद, करिष्मा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे.

या सिनेमाचे शूटिंग तीन भागांमध्ये होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होणार आहे. यश या पहिल्या भागासाठी सुमारे ६०ते ७० दिवसांचे शूटिंग करणार आहे.

रामायण ही एक ऐतिहासिक कथा असून, ती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा उद्देश या प्रोजेक्टमागे आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत असतील आणि त्यांच्यासोबत असेल वर्ल्ड-क्लास व्हिज्युअल इफेक्ट्स टीम, भव्य सेट्स आणि कलाकारांची मोठी फौज असेल.
Comments
Add Comment

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध