GT vs MI : आयपीएल एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी?

गुजरात मुंबईवर भारी पडणार का?


आयपीएल २०२५च्या पहिला फायनल संघ ठरला आहे. तब्बल ९ वर्षांनी आरसीबीच्या संघाने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता स्पर्धा आहे ती दुसरा फायनलिस्ट मिळवण्याची. या दुसऱ्या फायनलिस्टसाठी तीन संघांमध्ये चुरस रंगणार आहे. स्थान आहे एक आणि दावेदार आहेत तिघे. कोण मारणार बाजी? दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबविरुद्ध कोण खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.



आयपीएल २०२५मधील एलिमिनेटरचा सामना आज रंगत आहे. यासाठी आमनेसामने आहेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स. एकीकडे विजयाचे सातत्य असलेला गुजरात टायटन्सचा संघ तर दुसरीकडे सुरूवातीच्या पराभवातून वर आलेला मुंबई इंडियन्सचा संघ. हे दोन्ही संघ पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.


गुजरात टायटन्सने १४ सामन्यांपैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांत पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे तितकेच सामने खेळलेल्या मुंबईने ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ६ सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचे १८ गुण आहेत तर मुंबई इंडियन्सचे १६ गुण आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने हंगामाची सुरूवात खराब केली होती. मात्र नंतर त्यांनी विजयी लय पकडली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले.



मुंबईची फलंदाजी उत्तम आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करतायत. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी चांगला खेळ करणे गरजेचे आहे. सूर्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील हे चौथे वर्ष आहे. त्यापैकी केवळ गेल्याच वर्षीच्या हंगामात त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. आयपीएलमध्ये हेड टू हेड पाहिले तर गुजरातने या स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळे या एलिमिनेटरमध्ये कोण बाजी मारणार हे सामन्यानंतरच कळेल.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड