Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणेच्या बाळाचा ताबा आता 'या' व्यक्तीकडे, राज्य सरकारचा मोठा निर्णय !

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आपल्या राहत्या घरी दिनांक 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा रोप आहे. मात्र ही आत्महत्या नसून वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरे आणि नणंद यांना अटक केली आहे. मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचं संगोपन कोण करणार? असा प्रश्न होता, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.



मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती


वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची कस्टडी वैष्णवीचे आईवडील (कस्पटे कुटुंबीय) यांनी मागितली होती. मात्र यावर हगवणेकडून आक्षेप घेण्यात आला होता. किंबहुना वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ काही दिवस नीलेश चव्हाण याकडे होते, जे नंतर नाट्यमय पद्धतीने कस्पटे यांकडे सुपूर्द करण्यात आले होते. मात्र या बाळाच्या अधिकृत कस्टडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र आता, वैष्णवी हगवणेचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याची आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.


वैष्णवी हगवणेच्या मृत्यूपश्चात तिचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने आजी व वैष्णवी हगवणेची आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार, श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.


यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा