फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार आणि वीस जखमी

चंदिगड : पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी सकाळी फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. ही घटना सिंगावाली-कोटली मार्गावरील दोन मजली काखान्यात घडली. स्फोटामुळे कारखान्याची दोन मजली इमारत कोसळली. फटाका हाताळणीत हयगय झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस स्फोट प्रकरणी तपास करत आहेत.

फटाका कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन केल्यानंर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे. ताज्या घटनेमुळे फटाका कारखान्यांमध्ये सुरक्षेसाठीच्या नियमांचे पालन होते की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या