प्रहार    

आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

  50

आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकवणी घेतात त्यांना शिक्षक तसेच पाणी जोडणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण प्लम्बर अशा नावाने ओळखतो. परंतु, आता राज्य सरकार प्लम्बर या नावात बदल करून त्याचे वॉटर इंजिनिअर असे नामकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या व्यवसायाला समाजात अधिक मान्यता मिळेल.


मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सध्या प्लंबर हे घरगुती व औद्योगिक पाण्याच्या जोडण्या, नळांच्या दुरुस्त्या यांसारखी महत्त्वाचे कामे करत असले तरी त्यांना समाजात मिळणारा सन्मान फारसा नाही. त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.



याशिवाय, सरकार प्लंबरसाठी प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य प्रमाणपत्र कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील आणण्याच्या तयारीत आहे. ‘वॉटर इंजिनिअर’ या नव्या ओळखीमुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे आकर्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय अंतिम होण्यासाठी काही अधिकृत प्रक्रिया बाकी असली, तरी सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत होत आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्लम्बर व्यावसायिकांना सामाजिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन मांडणारे 'दशावतार'मधील 'आवशीचो घो' गाणं प्रदर्शित

Movie Song Release: टीजर आणि पोस्टरमुळे प्रदर्शनापूर्वीच सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक, शिवभक्तांचा उत्साह

ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठी गर्दी नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Health: चुकीच्या पद्धतीने 'हेल्दी फूड' खाण्याचे गंभीर दुष्परिणाम

मुंबई: अनेकदा आपण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खातो, ज्यामुळे त्याचे फायदे