निलेश चव्हाण अखेर नेपाळमध्ये सापडला; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलं आहे.


वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकणं, धमकावणं, आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या गंभीर आरोपाखाली निलेश चव्हाण फरार झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती.


पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी विशेष लक्ष केंद्रित करत, एक-दोन नव्हे तर तब्बल ६ शोध पथकं तयार केली होती. सुरुवातीला चव्हाण दुसऱ्या राज्यात लपल्याचा संशय होता, पण गोपनीय माहितीच्या आधारे तो नेपाळमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली.



लवकरच निलेश चव्हाणला भारतात आणून न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून आणखी अनेक महत्त्वाच्या बाबतीत माहिती मिळण्याची शक्यता असून, चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


हा गुन्हा केवळ आत्महत्येपुरता मर्यादित नसून, त्यामागे दबाव, छळ आणि गुन्हेगारी साखळी असल्याचा संशय आहे, त्यामुळे पुढील तपास अधिक गंभीर आणि व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी