कधी होणार महापालिकांच्या निवडणुका ? मंत्री बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

सोलापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याचे बावनकुळे म्हणाले. निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. आयोगाने वेळापत्रक जाहीर केले की, राज्य सरकार यंत्रणा म्हणून त्यांना सहकार्य करेल; असे बावनकुळेंनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी हे महायुती म्हणूनच लढवतील. अपवादात्मक ठिकाणी महायुतीतील पक्ष फ्रेंडली फाईट अर्थात मैत्रिपूर्ण लढती लढतील, असे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेमतेम चार महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्ष एकत्र लढले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही महायुतीतील घटक पक्ष व्यवस्थित नियोजन करण्यात गुंतले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी इंडी आघाडीने राज्यातील बहुसंख्य जागा जिंकल्या. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपाचे मुख्य लक्ष्य मुंबई महापालिका आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई ही देशातली पहिल्या क्रमांकाची महापालिका सध्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे. याआधी मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. भाजपाने मागच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभे केले होते. यामुळे आता काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिउबाठापुढे भाजपाचे तगडे आव्हान आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव आणि राज युती करणार अशी चर्चा निवडक प्रसारमाध्यमांमधून रंगवली जात होती. पण आता ही चर्चा थांबली आहे. पुण्यात दोन्ही पवार गट एकत्र येतील अशीही चर्चा आहे. पण प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर कोणता राजकीय पक्ष काय खेळी करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची