खासगी हद्दीतील फांद्यांची छाटणी महापालिका करणार

  32

झाड मालकाला नोटीस देऊन ही छाटणी महापालिकेच्या निधीतून करा


उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या मागणीनुसार प्रशासनाने घेतला निर्णय


मुंबई: खासगी इमारतींसह सोसायट्यांच्या जागेतील झाडांची छाटणी महापालिकेच्या वतीने नियुक्त कंत्राटदारमार्फत निःशुल्क केली जावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे, अखेर ही मागणी मान्य झाली आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेत झाड मालकाला नोटिस द्वारे दिलेल्या मुदतीत उपाययोजना न झाल्यास, संबंधित फांद्यांची छाटणी उद्यान विभागाच्या प्रचलित धोरणानुसार महानगरपालिकेच्या निधीतून नियुक्त ठेकेदारामार्फत करण्यात येईल. आणि कार्यवाही ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी म्हणून केली जाईलखासगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी महापालिका करीत नाही. ही झाडे खासगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. या झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका या खाजगी जागा मालकाकडून अथवा सोसायटी कडून शुल्क आकारते. ते जास्त आहे. जर खाजगी मालकाने अथवा संस्था, सोसायटीने शुल्क दिले नाही तर छाटणी होत नाही. त्यामुळे यापुढे पालिकेने पुढाकार घेऊन जी झाडे खाजगी जागेत जरी असली तरी ज्यांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत अशा झाडांची छाटणी पालिकेने मोफत करावी, अशी मागणी उपनगराचे मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली होती.


त्यानुसार याबाबत तातडीने कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक काढून आयुक्तांनी महापालिका यापुढे खाजगी जागेवरील झाडांची आपल्या खर्चातून करेल, असे निश्चित केले. प्रशासनाने या आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, खाजगी मालमत्तेवरील झाडे / झाडांच्या फांद्या / झावळ्या / फळे (नारळ) इत्यादी महापालिकेच्या रस्ते / पदपथ / इतर मालमत्तेकडे झुकत असल्यास संभाव्य अपघात टाळण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याकरिता धोरणात्मक कार्यपद्धती आहे.


मुंबई महनगरपलिकेच्या विविध भागांमध्ये खाजगी जागेवर असलेली झाडे/झाडांच्या फांद्या महापालिकेच्या रस्ते, पदपथ किंवा इतर सार्वजनिक मालमत्तेकडे धोकदायकरित्या झुकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पादचारी, वाहतूक, आणि महापालिकेच्या मालमत्तेस धोका निर्माण होतो.


पावसाळ्यात वृक्ष व फांद्या पडून होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याकरिता खालील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.


खासगी मालमत्तेवरील झाडे झाडांच्या फांद्या, झावळ्या, फळे (नारळ) महापालिकेच्या रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, सार्वजनिक चौक, उद्याने इत्यादीकडे झुकत असल्यामुळे पादचारी, वाहने किंवा सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याने ही कार्यपद्धती मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात लागू राहील. त्यानुसार, जी झाडे खाजगी जागेत असून त्यांच्या फांद्या महापालिकेच्या रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक मालमत्तेकडे झुकलेल्या आहेत आणि त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशी झाडे संबंधित विभागातील एच ए/ जे टी ओ / एएस जी यांनी सर्वेक्षण करावेसंबंधित झाड मालकास संदर्भित झाड तथा झाडाच्या फांद्या इत्यादी धोकादायक असल्याबाबत व त्याची छाटणी विहित मुदतीत तातडीने करणे आवश्यक असल्याबाबत लेखी नोटीस देण्यात यावी. या नोटिस द्वारे दिलेल्या मुदतीत उपाययोजना न झाल्यास, संबंधित फांद्यांची छाटणी उद्यान विभागाच्या प्रचलित धोरणानुसार महानगरपालिकेच्या निधीतून नियुक्त ठेकेदारामार्फत करण्यात येईल. कार्यवाही ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी म्हणून केली जाईल,असे नमुद केले आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता