मुंबई पोलिसांना मिळणार डिजिटल स्मार्ट ओळखपत्र

चार कोटींच्या अंदाजपत्रकास गृह विभागाची मान्यता


मुंबई  : बनावट पोलीस ओळखपत्राच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. डिजिटल ओळखपत्रासाठी लागणाऱ्या चार कोटी रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकास गृह खात्याने मंजुरी दिली असून यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.


मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिले जाते. कोणत्याही डीटीपीच्या साह्याने या ओळखपत्राची नक्कल होऊ शकते. अशाप्रकारे बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. ऑनलाईन माध्यमातून बनावट ओळखपत्राचा वापर करून 'डिजिटल अरेस्ट'चे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई पोलीस आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाला सादर केला होता.विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.



मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर अधिकारी - कर्मचाऱ्यांची मिळून ५१ हजार ३०८ पदे मंजूर आहेत. या सर्वांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहे. पोलिसांना असे स्मार्ट ओळखपत्र देणारे मुंबई पोलीस आयुक्तालय हे पहिले शासकीय कार्यालय ठरणार आहे. दरम्यान, ओळखपत्र तयार करताना गोपनीयता पाळणे आवश्यक असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांच्या स्तरावर बंद निविदा प्रक्रिया राबविण्यास गृह खात्याने मान्यता आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांच्या तोंड पाणी पळण्याची भीती, काय आहे कारण..

मुंबई: मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुलातील

भेंडीबाजारात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवरील कारवाई होणार तीव्र

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि