Ladki Bahin Yojana : आईशपथ... २ हजारांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

नकली लाडक्या बहिणींकडून सरकार करणार वसुली


लाडक्या बहिणींचा दीड हजारांचा मोह काही सुटेना


मुंबई : लाडकी बहीण योजना ही कायमच चर्चेचा विषय ठरलेली आहे. कधी १५०० रुपयांवरून तर कधी २१०० रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार या मुद्यावरून.. गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती. या योजनेद्वारे लाभार्थी महिलाना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. मात्र, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही. अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.



३ कोटी ५८ लाखांची कमाई


लाडकी बहीण येजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेकांनी फसवून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट २०२४ पासून एप्रिलपर्यंत म्हणजे ९ महिन्यांत प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये घेतले. याचा अर्थ ३ कोटी ५८ लाखांची कमाई त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आणखी ६ लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी ६ लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



नकली बहिणींकडून शासन करणार वसुली


आता ज्या २ हजार महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनून पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची (३ कोटी ५९ लाख रु.) वसुली करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद