अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडून अत्याचार

शेवगाव : तालुक्यातील एका ग्रामीण भागात जन्मदात्या पित्यानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. सदर मुलगी अल्पवयीन असून तिने स्वतः दिलेल्या फिर्यादी वरुन तिच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, सदर आरोपी काही महिन्यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून सजा भोगून आल्यावर त्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त आहे.


पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, तिच्या वडिलांना दारुचे व्यसन असून ते नशेत आईस शिवीगाळ, मारहाण करतात. दि. २६ रोजी पीडितेची बहीण व तिचा नवरा हे त्यांच्या घरी आले होते. यावेळी आरोपीने दारु पिऊन त्यांच्याशी भांडण केले. त्यामुळे ते दोघे त्यांच्या गावी निघून गेले. त्यांना घाबरुन पीडित मुलगी व तिची आई तेथून पळून गेले. दि. २९ रोजी सदर पीडित मुलगी तिच्या काकांच्या घरी काकू सोबत असताना, आरोपीने तिथे घरी जाऊन चाकूचा धाक दाखवत धमकावले. यावेळी सदर मुलीची चुलती तेथून भिऊन तेथून पळून गेली.


यावेळी आरोपीने स्वतःच्या मुलीला हाताला धरुन ओढून नेत एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी पीडितेला चाकूचा धाक दाखवत, जीवे मारण्याची धमकी देत बळजबरी करुन शारीरिक संबंध केला. त्यानंतर पीडितेला हाताला धरुन दुसरीकडे घेऊन जात असताना सदर मुलीने त्याच्या हाताला चावा घेऊन स्वतःची सुटका करुन घेत तेथून पळून गेली.


त्यानंतर तिने तिच्या काकाचे घर गाठून घडलेला प्रकार तिच्या चुलतीला सांगितला.यावेळी चुलतीने पीडितेची आई व इतर नातेवाईकांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल होऊन आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत काही तासात आरोपीला गजाआड केले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या