पनवेलमधून आणखीन एक वैष्णवी हगवणे प्रकरण समोर, चिमुकलीसह संपवले जीवन

पनवेल: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची अनेक धक्कादायक प्रकरणं आता उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुक्यातील पेठाली गावात सोनम अभिषेक केणी (वय ३०) हिने आपल्या देवांशी या पाच वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  सुरुवातीला पोलिसांनी मुलीचा अपघाती मृत्यू व सोनमने नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद केली होती. मात्र, ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून हत्या केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केला आहे. 24 एप्रिल रोजी सोनमनं गळफास लावून जीव दिल्याची माहिती आहे.

मुलासाठी आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी होत होता मानसिक छळ


सोनमच्या वडिलांनी 1 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नापासून मुलगा नसल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सोनमचा सासरच्यांकडून सतत तिचा  मानसिक छळ होत होता. या आधारावर पोलिसांनी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पती आणि सासू फरार


सोनमने मुलीचा खून केला की दोघींचाही मृत्यू अन्य कारणाने झाला, याचा तपास पोलीस करत असून, सोनमची सुसाईड नोट व वैद्यकीय अहवालातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती फरार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तळोजा पोलिसांकडून सोमनच्या चारही नणंदांची चौकशी सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत.
Comments
Add Comment

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या