IPL 2025: RCB विरुद्ध पराभवानंतर पंजाब किंग्सच्या नावावर लाजिरवाणे रेकॉर्ड

  38

मुंबई: पंजाब किंग्सला ८ विकेटनी हरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. २९ मेला गुरूवारी मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात आरसीबीला विजयासाठी १०२ धावांचे आव्हान मिळाले होते. त्यांनी हे आव्हान १० षटकांतच पूर्ण केले.


आरसीबीचा संघ चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी त्यांनी २००९, २०११ आणि २०१६च्या हंगामातही फायनलमध्ये स्थान मिळवले होते. दरम्यान, तीन वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.



सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर पंजाबच्या नावावर लाजिरवाणे रेकॉर्ड्स


आता ३ जूनला मंगळवारी रॉयल चॅलेंजर्सचा सामना बंगळुरूच्या क्वालिफायर २मधील विजेत्याशी होणार आहे. १ जूनला रविवारी होणाऱ्या क्वालिफायर २मध्ये पंजाब किंग्सची टक्कर एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी होणार आहे.


एलिमिनेटर सामन्यात ३० मेला शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. हा सामना मुल्लांपूरमध्ये असणार आहे. क्वालिफायर १मध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजांना खेळपट्टीची कल्पना आली नाही आणि त्यांचे सातत्याने विकेट पडत गेले. पंजाब किंग्सच्या खराब फलंदाजीवरून याचा अंदाज लावता येऊ शकतो.


आयपीएलच्या एखाद्या प्लेऑफ सामन्यात असे पहिल्यांदा झाले जेव्हा एखादा संघ १५ पेक्षा कमी षटकांत ऑलआऊट झाला. आयपीएल प्लेऑफमध्ये सगळ्यात कमी षटके खेळण्याचा रेकॉर्ड दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर होता. दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या सुरूवातीच्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या सेमीफायलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना १६.१ षटकेही खेळू शकला होता.


पंजाब किंग्सचा आयपीएलच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात कमी ऑलआऊट टोटल होता. पंजाब किंग्सचा सर्वात कमी स्कोर ७३ इतका आहे. त्यांनी २०१७मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध हा स्कोर केला होता.

Comments
Add Comment

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव रुग्णालयात

नवी दिल्ली : भारताच्या टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जर्मनीतील रुग्णालयात आहे. सूर्यकुमार यादववर

अभिनेता सलमान खान बनला दिल्ली फ्रँचायझीचा मालक

नवी दिल्ली : देशातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या

कसोटी सामन्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी

लीड्स : इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत ने उत्तम कामगिरी केली आहे . कसोटी क्रिकेट च्या इतिहासात

दिनेश कार्तिकने केली टीम इंडियाची डॉबरमॅनशी तूलना, विधानाने खळबळ

लीड्स: इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा लीड्स कसोटीमध्ये 5 विकेट्सने निराशाजनक पराभव पत्करावा लागला.

नीरज चोप्राने ५ दिवसांत सलग दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव

पॅराग्वे :नीरज चोप्राने ५ दिवसांत सलग दुसऱ्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने चेक प्रजासत्ताकमधील

IND vs ENG 1st Test: ५ शतके झळकावूनही सामना हातून गेला! शेवटच्या दिवशी इंग्लंडने मारली बाजी

इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. लीड्स:  हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या