पालीत नागरिकांचे आरोग्य संकटात

खोपोली महामार्गावर रासायनिक कचऱ्याचा खच


सुधागड-पाली :पाली-खोपोली महामार्गावरील दापोडे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एस्सार पेट्रोल पंपाच्या शेजारी हा कचरा खुलेआम फेकण्यात आला असून मुसळधार पावसामुळे तो पाण्यात मिसळत थेट आंबा नदीत पोहोचत आहे. हीच नदी पाली शहरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्याला धोका; नागरिकांची चिंता
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूषित पाणी पिल्याने त्वचेचे विकार, पचनतंत्राच्या समस्या, गंभीर आजार आणि कॅन्सर यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील शेती, जंगलातील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची उदासीनता ही कोणाची जबाबदारी?


प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रदूषण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला तपासणीसाठी पत्र पाठवल्याचे सांगितले, मात्र आत्तापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रासायनिक कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, रासायनिक कचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास प्रशासनाने संपूर्णतः जबाबदार राहिले पाहिजे. स्थानिकांनी या प्रश्नावर जागरूकता वाढवून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली पाहिजे.

Comments
Add Comment

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार