मुंबईत १ जूनपासून बेस्टच्या नव्या AC बस सेवा; काही मार्गात बदल; नेहमीच्या बसमार्गात बदल झाला आहे का, याची खात्री करा...

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रशासन १ जूनपासून मुंबई शहरात नव्या वातानुकूलित (AC) बस सेवा सुरू करत आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्गांत बदल करण्यात आले आहेत.



नवीन A-८ सेवा


आतापर्यंत मंत्रालय ते शिवाजीनगर टर्मिनसदरम्यान धावणारी ‘बस क्र. ८’ आता AC बसमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. ही बस आता ‘A-८’ या क्रमांकाने ओळखली जाईल.





  • पहिली बस: मंत्रालयातून सकाळी ८:०५ वाजता




  • शेवटची बस: रात्री १०:५० वाजता





महत्त्वाचे मार्ग बदल व नवीन AC सेवा


नवीन AC सेवा सुरू होणारे मार्ग:




  • मार्ग ४४: काळाचौकी – वरळी




  • मार्ग ५६: वरळी डेपो – वर्सोवा यारी रोड (फक्त रविवारी AC बस)




  • मार्ग १२५: नेव्ही नगर – वरळी डेपो




  • मार्ग २४१: सांताक्रूझ – मालवणी (पूर्वी माहिम – मालवणी)




  • A-२५: कुर्ला डेपो – बॅकबे (आता सायन येथेच समाप्त)




पश्चिम उपनगरांतील AC सेवा:




  • मार्ग २४३: मालाड स्टेशन (प.) – जनकल्याण नगर




  • मार्ग ३४३: गोरेगाव स्टेशन (पू.) – फिल्म सिटी




  • मार्ग ३४४: गोरेगाव (पू.) – संकल्प सोसायटी / नागरी निवारा प्रकल्प-४




नवीन सुरू होणारे AC मार्ग:




  • ३४७: गोरेगाव (पू.) – गोखुलधाम




  • ४५२: गोरेगाव (पू.) – मयूर नगर




  • ४५९: मुलुंड रेल्वे स्थानक – मालवणी डेपो




  • ६०२: कांजूरमार्ग – हिरानंदानी पवई




  • ६२६: मालाड स्टेशन (प.) – भुजाले तलाव




ठाणेकरांसाठी विशेष सेवा – A-४९०


मंत्रालय ते ठाणे बालकुम दरम्यान ‘A-४९०’ ही नवीन AC सेवा सुरू केली जाणार आहे. यासोबतच, A-१७५ ही रिंग बस सेवा प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा, खुदादाद सर्कल व पोर्तुगीज चर्च मार्गे धावणार आहे.



बेस्टकडून प्रवाशांना आवाहन


ही नवीन वातानुकूलित सेवा प्रवाशांसाठी अधिक सुरळीत, आरामदायक आणि आधुनिक प्रवास अनुभव देईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांनी नवीन वेळापत्रक आणि मार्गांमधील बदलांची माहिती लक्षपूर्वक पाहून प्रवास करावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस